पापड बॉम्ब (papad bomb recipe in marathi)

Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
पुणे

#GA4
#week23
#papad
हा कीवर्ड घेऊन मी #पापड_बॉम्ब बनवले. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात आणि झटपट तयार होणारे हे स्टार्टर तुम्हाला नक्की आवडतील.

पापड बॉम्ब (papad bomb recipe in marathi)

#GA4
#week23
#papad
हा कीवर्ड घेऊन मी #पापड_बॉम्ब बनवले. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात आणि झटपट तयार होणारे हे स्टार्टर तुम्हाला नक्की आवडतील.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ व्यक्ती
  1. ८-१० छोटे बटाटे
  2. 1/2 वाटीदही
  3. 5पापड
  4. 1/2 चमचातिखट
  5. 1/2 चमचाचाट मसाला
  6. 1/2 चमचाकाळे मीठ
  7. 1/2 चमचाजिरेपूड
  8. 2 चमचेकसूरी मेथी
  9. 1 चमचातांदळाचे पीठ
  10. तळण्यासाठी तेल
  11. 4 चमचेमेयोनिज
  12. 4 चमचेशेझवान चटणी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    बटाटे उकडून गार करून घ्या. कसूरी मेथी बारीक चुरून घ्या.

  2. 2

    बटाटे सोलून घ्या. मग टोचण्याने सर्व बाजूंनी टोचून घ्या. दह्यात चाट मसाला, तिखट, जिरेपूड, काळे मीठ, कसूरी मेथी आणि तांदळाचे पीठ मिसळून घ्या. मिश्रण दाटसर झाले पाहिजे. पापडांचा चुरा करून घ्या.

  3. 3

    आता बटाटे दह्याच्या मिश्रणात व्यवस्थित वरखाली करून मग १५ मिनिटे मॅरीनेट करत ठेवा.

  4. 4

    मग एकेक बटाटा पाप डाच्या चुऱ्य यात व्यवस्थित घोळवून घ्या. असे सर्व बटाटे तयार करून घ्या.

  5. 5

    कढईत तेल तापले की मध्यम आचेवर बटाटे तळून घ्या. किचन नॅपकिन वर काढून निथळत ठेवा.

  6. 6

    एका शॉट ग्लासला कडेने मेयोनिज आणि शेझवान चटणी थोडी थोडी लावून घ्या. एका टूथपिक वर दोन तळलेले बटाटे लावून ती ग्लास मध्ये रचून ठेवा. तयार आहे पापड_बॉम्ब!! दही, चाट मसाला, कसूरी मेथी यांचा एकत्रित स्वाद अप्रतिम लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes