पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#डिनर
#साप्ताहिक डिनर प्लॅनर
#गुरुवार
#पनीर टिक्का

पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)

#डिनर
#साप्ताहिक डिनर प्लॅनर
#गुरुवार
#पनीर टिक्का

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनीटे
3/4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमपनीर
  2. 1सिमला मिरची
  3. 1कांदा
  4. 1/4 कपदही
  5. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1- 1/2 टीस्पून जिरेपूड
  7. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  8. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  9. 1/2 टीस्पूनकाळे मीठ
  10. 1/2 टीस्पूनकाळीमीरी पुड
  11. 1 टीस्पूनआललसुण पेस्ट
  12. 2 टेबलस्पूनभाजलेले चण्याचे पीठ
  13. 1/2 टीस्पूनलिंबाचा रस
  14. 1 टेबलस्पूनकसुरी मेथी
  15. 1/2 टीस्पूनमीठ
  16. 2 टेबलस्पूनराईचे तेल
  17. 1 टेबलस्पूनबटर

कुकिंग सूचना

30मिनीटे
  1. 1

    कांदा,सिमला मिरची,पनीर चे चौकोनी तुकडे करून घ्या.खालील प्रमाणे तयारी करावी

  2. 2

    चण्याचे पीठ कोरडेच भाजून घ्या.दही नि चण्याचे पीठ छान एकजीव करा गुठळ्या राहायला नको. त्यानंतर त्यात सर्व जिन्नस घालून छान मिसळून घ्या.

  3. 3

    आता सिमला मिरची चे तुकडे नि कांद्याचे तुकडे मसाल्यात मिसळून घ्या व नंतर पनीरचे तुकडे टाकून अलगत हाताने मसाला लागेल असे मिसळून घ्या नि सर्व मॅरीनेट करण्यासाठी 15/20मिनीटे तरी ठेवा जास्त ठेवले तरी चालेल 1तास.

  4. 4

    मॅरीनेट झाले कि खालीलप्रमाणे पनीर,सिमला मिरची,कांदा तुकडे स्टीकला टोचून घ्या.

  5. 5

    आता तव्यावर 1/2टेबलस्पून बटर ग्रीस करा नि स्टीक ठेवा नि चारी बाजूंनी शेकून घ्या

  6. 6

    मस्त झणझणीत पनीर टिका तयार आहे पुदिना चटणीबरोबर खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes