मिनी रसगुल्ले (mini rasgulla recipe in marathi)

Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233

#GA4 #Week24
#Rasgulla हा कीवर्ड घेऊन मी घरच्याच गाईच्या दुधापासून रसगुल्ले बनविले आहे. रसगुल्ला ही बंगाली मिठाई आहे आणि सर्वांना अतिशय आवडणारी अशी रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने रसगुल्ले खातात. रसगुल्ले म्हटले की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहातं नाही. मी मिनी रसगुल्ले बनविले आहे आणि गायीच्या दुधाचे रसगुल्ले बनविले आहे खूप छान होतात गायीच्या दुधाचे रसगुल्ले.

मिनी रसगुल्ले (mini rasgulla recipe in marathi)

#GA4 #Week24
#Rasgulla हा कीवर्ड घेऊन मी घरच्याच गाईच्या दुधापासून रसगुल्ले बनविले आहे. रसगुल्ला ही बंगाली मिठाई आहे आणि सर्वांना अतिशय आवडणारी अशी रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने रसगुल्ले खातात. रसगुल्ले म्हटले की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहातं नाही. मी मिनी रसगुल्ले बनविले आहे आणि गायीच्या दुधाचे रसगुल्ले बनविले आहे खूप छान होतात गायीच्या दुधाचे रसगुल्ले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ ते ५० मिनिटे
६ जणांसाठी
  1. 1 लिटरदूध
  2. 2लिंबाचा रस
  3. 1 (1/2 कप)साखर
  4. 4 (1/2 कप)पाणी

कुकिंग सूचना

४५ ते ५० मिनिटे
  1. 1

    प्रथम दूध गॅसवर तापायला ठेवावे आणि लिंबूच्या रसामध्ये तेवढेच पाणी टाकून टाकून घ्यावे.

  2. 2

    दूध तापले की त्यात थोडा थोडा लिंबाचा रस टाकावा एका वेळेस पूर्ण टाकू नये. जोपर्यंत दूध पूर्णपणे फूटत नाही तोपर्यंत थोडा थोडा लिंबाचा रस टाकत राहावे आणि ढवळत राहावे. आता त्यामधील दूध आणि पाणी वेगळे होत आहे.

  3. 3

    नंतर त्यामध्ये थंड पाणी टाकावे, आणि एका पातेल्यावर चाळणी ठेवून त्यावर एक कॉटनचा कापड ठेवावा, आणि त्यामध्ये फाटलेले दूध ओतावे आता त्यामध्ये पाणी टाकून छना धुवून घ्यावा. छना दोन-तीन पाण्याने धुऊन घ्यावा म्हणजे त्यातील लिंबाची चव निघून जाईल आणि दोन तासासाठी छेना कापडामध्ये बांधून ठेवावा म्हणजे त्यातील सर्व पाणी निघून जाईल.

  4. 4

    जर लवकर रसगुल्ले बनवायचे असेल तर लवकर एक तासांमध्ये पण काढू शकता आता दोन तासानंतर त्यातील सर्व पाणी निघून गेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यावा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यावा म्हणजे ते लवकर एकजीव होईल.

  5. 5

    छना छान एक जीव झाला की एका परातीत काढून घ्यावा आणि छान मिक्स करून त्याचे गोळे बनवून घ्यावे 40 ते 50 गोळे तयार होतात आणि एका पातेल्यात साखर आणि पाणी घालून उकळून घ्यावे.

  6. 6

    पाण्याला फक्त उकळी येऊ द्यावी पाक करू नये आणि त्याला उकळी आली की त्यात लगेच तयार केलेले छण्याचे गोळे टाकावे आणि शिजवून घ्यावे आणि थोड्या थोड्या वेळाने हलवत राहावे म्हणजे एकाला एक चिपकणार नाही. तयार आहे एकदम स्पोंजी रसगुल्ला हाताने दाबला की एकदम कापसासारखा मऊ.

  7. 7

    सर्विग साठी तयार आहे मिनी रसगुल्ला तुम्ही पण नक्की करून बघा खूप छान होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes