दह्यातील साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#kr
साबुदाणा खिचडी सर्वं घरात आवडीचा पदार्थ, उपवास असो किंवा नसो साबुदाणा खिचडी खायला सगळयांनाच आवडते. त्यात मी लहान असताना आमच्या एकत्र कुटुंबात साबुदाणा खिचडीचे अनेक प्रकार केले जायचे त्यातीलच एक प्रकार म्हणजे दह्यातील साबुदाणा खिचडी एकदम वेगळा न करायला सोपा पदार्थ,त्यात हा साबुदाणा पाण्यात न भिजवता दह्यात भिजवून करायचा त्यामुळे याची चवच न्यारी.
साबुदाणा हा कायब्रोहायड्रेड, कौल्शिअयम, व्हिटॅमिन सि युक्त असा असून सांधे - हाडांच्या आजारावर अतिशय उपयुक्त आहे .तसेच स्नायू बळकट करण्यासाठी व पोटाच्या आजारांवर औषधी, व वजन वाडीसाठी मदत करणारा असा आहे .तर मग बघूयात कशी करायची ही दह्यातील साबुदाणा खिचडी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीसाबुदाणा
  2. 1 कपदही
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 1/2 वाटीशेंगदाणे कूट
  5. 1 चमचाउपवासाचे मीठ
  6. 1/2 चमचासाखर
  7. 1 चमचाजीरे
  8. 2 चमचेतूप
  9. 2 चमचेकोथिंबीर
  10. 1/2 वाटीडाळींबाचे दाणे

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    साबुदाणा व दही घ्या,साबुदाणा पाण्याने एकदा स्वच्छ धुऊन पाणी काढून टाका, दह्या मध्ये थोडं पाणी घालून पातळ करून त्यात साबुदाणा 6-7 तास भिजत ठेवा

  2. 2

    भिजलेला साबुदाणा व इतर साहित्य एकत्र घ्या,मग कढई मध्ये तूप घालून गॅस चालू करून त्यात जीरे,मिरची टाकून फोडणी करून घ्या, एक भांड्यात साबुदाणा, शेंगदाणे कुट, मीठ,साखर, कोथिंबीर, डाळींब दाणे एकत्र करून घ्या व वरून जीरे मिरचीची फोडणी ओता

  3. 3

    फोडणी ओतल्यावर पुन्हा सगळं मिक्स करा,मग तयार झाली आपली दह्यातील साबुदाणा खिचडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या (5)

Similar Recipes