चवळी सूप (chawali soup recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#सूप माझ्याकडे छान मोड आलेले चवळी होती. आणि त्याचे छान सूप बनवायचे असे ठरवले. आणि काय सांगू घरच्यांनी त्याचा फडशा पडला. ह्यातच काय ते कळले. इतके टेस्टी झालेले. कशाचे केले फार सुंदर आहे असे विचारले जात होते. पुन्हा कर अशी डिमांड आली. त्यामुळे तुम्ही पण जरूर ट्राय करा.हेल्दी पोटभरीचे न्यूट्रीशियस आहे हे. हेल्दी पोटभरीचे न्यूट्रीशियस आहे हे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनिटं
3 सर्व्हिन्ग
  1. 1/2 कपमोड आलेली चवळी
  2. 30 ग्रॅमटोमॅटो (1नग)
  3. 20 ग्रॅमबटाटा (1नग)
  4. 3 टीस्पूनतुप
  5. 1/2 टीस्पूनहिंग
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनमिरे पूड
  8. 1 टेबलस्पूनलसूण
  9. 1 टेबलस्पूनआलं
  10. चवीनुसारमीठ
  11. आवश्यकतेनुसार पाणी
  12. 2 टीस्पूनमिरची तुकडे
  13. 1 टीस्पूनजिरे पूड
  14. 2 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरून

कुकिंग सूचना

25-30 मिनिटं
  1. 1

    कुकर मध्ये चवळी धुन हळद घालून ते व टोमॅटो बटाटा शिजवून घ्या. तोवर कोथिंबीर चिरून घ्या.मिरची तुकडे करून घ्या.

  2. 2

    शिजून झाल्यावर त्यातील 2-4 टेबलस्पून चवळी काढून ठेवा बाजूला. मग सर्व जिन्नस थंड झाले की मिक्सरवर बटाटा टोमॅटो आले लसूण बारीक पेस्ट करून घ्या.

  3. 3

    कढईत तुपजिरे हळद हिंग मिरे मिरची घालून ही पेस्ट घाला. 2कप पाणी ऍड करा. छान उकळी आणा.झाले की गॅस बंद करा त्यात बाजूला काढलेले चवळी दाणे घाला. त्यामुळे मध्ये पिताना ते मस्त लागतील

  4. 4

    सूप ऐका कप मध्ये सर्व्ह करा. वरून कोथिंबीर क्रीम घाला. आणि अजून टेम्पटिंग बनवा. **चवळी सूप ** तयार आहे. अतिशय हेल्दी व पोटभरीचे आहे हे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes