शेव पुरी (sev puri recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र. रेसिपी क्र. 1
#मुंबई स्ट्रीट फूड शेव पुरी

शेव पुरी (sev puri recipe in marathi)

#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र. रेसिपी क्र. 1
#मुंबई स्ट्रीट फूड शेव पुरी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30मिनिटे
5 जणांसाठी
  1. 1मोठा बटाटा
  2. 1मध्यम आकाराचा कांदा
  3. 2-3 टेबलस्पूनटोमॅटो
  4. थोडी कोथिंबीर
  5. 1/2 कपलसूण चटणी
  6. 1/2 कपहिरवी चटणी
  7. 3/4 कपचिंचेची गोड चटणी
  8. 1 कपबारीक शेव
  9. 25-30शेव पुरीच्या पुऱ्या
  10. 1/2 कपखारी बुंदी किंवा तिखट चना डाळ
  11. 2 टेबलस्पूनखारे शेंगदाणे
  12. 1/4 टीस्पूनमीठ
  13. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  14. 1/2लिंबू

कुकिंग सूचना

25-30मिनिटे
  1. 1

    बटाटा उकडून, सोलून व वाटी मध्ये कुस्करुन घेणे. कांदा, टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावेत.

  2. 2

    हिरवी चटणी- (कोथिंबीर, पुदीना, लसूण,मीठ,थोडे पाणी)
    लसूण चटणी- (लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट, मीठ, थोडेसे पाणी)
    चिंचेची गोड चटणी. या चटण्या करून घेणे.

  3. 3

    एका वाटी मध्ये कुस्करलेला बटाटा, कांदा,मीठ घालून मिक्स करून घेणे. एका डिशमध्ये पुऱ्या ठेवून घेणे.त्यावर बटाटा ठेवून घेणे. त्यावर टोमॅटोचे तुकडे घालून घेणे.

  4. 4

    त्यावर हिरवी चटणी, लसूण चटणी,चिंचेची चटणी घालून घेणे. शेव, डाळ किंवा बुंदी,शेंगदाणे घालणे. चाट मसाला घालणे.वरून लिंबू पिळणे.कोथिंबीर घालणे.पुन्हा चिंचेची गोड चटणी घालून व शेव घालावी.

  5. 5

    मुंबई स्पेशल शेव पुरी स्ट्रीट फूड तयार!
    चटणी घालताना आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes