पनीर फ्रँकी (paneer frankie recipe in marathi)

prajakta mhatre
prajakta mhatre @PrajaktaMhatre

#ms
मुलच काय पण मोठेही रोज तेच तेच चपाती आणि भात खाऊन कंटाळतात. आहो करणार्‍यालाही रोज रोज तेच करायचा कंटाळा येतच असतो पण नाईलाज असतो बरेचदा. कारण नविन पदार्थ करायचा म्हटल की सामानाची जुळवा जुळव, तयारी करावी लागते. मग इच्छा असून पण सामान किंवा वेळ नसल्यामुळे कधी कधी ठरवलेले मनातले बेतच रद्द करावे लागतात. असो तर काय झाल त्या दिवशी असाच मुलिंना कंटाळा आला रोजच्या जेवणाचा मग म्हणाल्या आज काहीतरी वेगळ कर. आता काय वेगळ म्हटल की पहिला मी पुस्तकं काढून बसायचे पण आता घेतला मोबाईल आणि युट्युबवर सर्च केल पोटभरीचेच म्हणजे जेवणासारखे कोणते पदार्थ करता येतील ते. तेव्हा चपात्यांमध्ये सजावट करुन भरलेल्या फ्रँकी दिसल्या. खरतर आपल्याच कडची आतली भाजी आणि चपाती पण फ्रँकी बोललं की कस विशेष पदार्थ वाटतो. मग ठरवल आज फ्रँकी करू. थोड सामान बाजारातून आणल आणि खाली दिलेल्या रेसिपी प्रमाणे केली फ्रँकी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
५-६
  1. 2 वाट्यागव्हाचे पीठ
  2. अमुल बटर
  3. 1 टीस्पूनचाट मसाला
  4. चीज
  5. 1 टीस्पूनमेयाॅनीज
  6. गुंडाळण्यासाठी अ‌ॅल्युमिनिअम फाॅईल
  7. आतील कटलेटसाठी
  8. 1 वाटीवाफवलेले मटार
  9. 2-3मोठे बटाटे उकडून मॅश करुन
  10. 1 वाटीकुस्करलेल पनीर
  11. चिमुटभरहिंग
  12. 1/4 चमचाहळद
  13. 1 चमचामिरची पूड
  14. 1 चमचागरम मसाला
  15. तेल
  16. गरजे नुसार मीठ
  17. सजावटीसाठी
  18. कोबी
  19. गाजर
  20. रंगीत सिमला मिरच्या
  21. कांदा कोबी या सर्व भाज्या लांबट आकारात थोड्या प्रमाणात कापून घ्या

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    गव्हाचे पीठ घेवून त्यात चमचाभर तेल आणि चिमटीभर मीठ घालून हळू हळू पाणी घालून चपातीसाठी पीठ मळा. १० मिनीटांनी चपात्या लाटून भाजून घ्या.

  2. 2

    पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर हिंग, हळद टाकून मटार टाका. परतवुन मिरची पावडर व गरम मसाला घाला ते परतवल की पनीर आणि मॅश केलेला बटाटा घाला. मीठ घाला एक वाफ आल्यावर गॅस बंद करा.

  3. 3

    हे मिश्रण थोड थंड झाल की त्याचे लांबट कटलेट बनवा.

  4. 4

    कटलेट पॅनमध्ये थोड्या तेलावर शॅलो फ्राय करुन घ्या.

  5. 5

    सजावटीच्या भाज्या एका पॅनमध्ये थोड्या तेलावर परतवा. त्यात चाट मसाला टाका. पण शिजवायच्या नाहीत. कडक राहिल्या पाहिजेत.

  6. 6

    चपाती थोडी तव्यावर शेकवून चपातीला बटर लावून घ्या.

  7. 7

    आता त्यावर मेयॉनिज पसरवा.

  8. 8

    मध्यभागी सजावटीच्या भाज्या उभ्या लावायच्या आणि त्यावर कटलेट ठेवून त्यावर चिज किसून पसरवायच. वरून थोडा चाट मसाला भुरभुरवायचा

  9. 9

    मग चपातीची जी बाजू बेस करणार आहोत ती आधी दुमडायची मग त्यावर बाजूच्या दोन बाजू दुमडायच्या.

  10. 10

    गुंडाळून झाल की खाली अ‍ॅल्युमिनीयम फॉईल गुंडाळायची झाली तुमची फ्रॅ़ंकी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
prajakta mhatre
prajakta mhatre @PrajaktaMhatre
रोजी

Similar Recipes