तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#EB9
#Week9
#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज
#तिळगुळाची वडी 😋😋
मकरसंक्रांतिचा गोड संदेश 🙏
तिळगुळ घ्या गोड बोला मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण !
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...!

तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)

#EB9
#Week9
#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज
#तिळगुळाची वडी 😋😋
मकरसंक्रांतिचा गोड संदेश 🙏
तिळगुळ घ्या गोड बोला मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण !
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1-1/4 कप शेंगदाणे
  2. 3/4 कपतीळ
  3. 2 कपगूळ
  4. 1 टेबलस्पूनतूप
  5. 2 टेबलस्पूनभाजलेले तीळ
  6. 2 टेबलस्पूनकिसलेले खोबरे
  7. 1 टीस्पूनवेलची आणि जायफळ पावडर

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यावे. आणि मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. गुळ बारीक चिरून घ्यावा.आता गॅस सुरू करून त्यावर एका कढईमध्ये तूप टाकावे. गुळ टाका आणि मिक्स करून घ्यावे. गुळाचा कडक पाक तयार करून घ्यावा.

  2. 2

    मंद गँस वर शांतपणे हलवत हलवत गुळाचा पाक करायचा. फेसाळलेला चॉक्लेटी ब्राऊन किंवा मरून कलर येतो. पाक मध्ये मध्ये चेक करायचे. चमच्याने टिपका भर पाक प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये टाकावा आणि तुटतो का चेक करा. त्यानंतर गुळाचा छोटा गोळा पाण्यातून काढून घ्यावा, आधी गोळा मऊ होईल. मग जरा जाड मग कडक तटकन तुटतो. गॅस बंद करून घ्यावा. त्यामध्ये वरील सर्व साहित्य टाकून नीट मिक्स करून कढई मध्ये मिश्रण दोन मिनिटे गार होऊ द्यावे.

  3. 3

    ताटांना आणि लाटण्याला तूप लावून घ्यावे. ताटावर मिश्रण घेऊन लाटण्याने नीट पसरून जेवढे जाड पाहिजे तेवढे लाटून घ्या आणि लगेच चाकूने चौकोनाचा आकार द्यावा. 30 मिनटामध्ये वड्या गार होतात, तुकडे करा आणि आस्वाद घ्या. खमंग आणि स्वादिष्ट आणि..... हो पौष्टिक ही... गूळ दाणे तीळ सगळेच healthy😄😄 नक्की ट्राय करा....तीळ गुळाची चिक्की
    धन्यवाद 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes