स्ट्रीट स्टाईल बदाम मिल्कशेक (Street style badam milkshake recipe in marathi)

बदलत्या ऋतूमध्ये बदाम शेक पिण्याची गोष्टच काही और असते. बदाम खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. सोबतच त्यानं स्मरणशक्ती चांगली राहते. बदाम मेंदू तल्लख बनवतो.
तसं तर बदाम विविध पदार्थांमध्ये वापरला जातो. मात्र बदाम शेक ही एक सोपी रेसिपी आहे. या स्वादिष्ट बदाम शेकमध्ये तुम्हाला विलायची, केशर आणि मलईची चव मिळेल.
पाहूयात रोडसाईडला मिळणारं बदाम मिल्कशेक.

कुकिंग सूचना
- 1
ब्लेंडरमधे भिजवलेले बदाम आणि दूध घालून छान बारीक वाटून घ्या.
- 2
कढईत दूध गरम करण्यासाठी ठेऊन द्या. व एकीकडे १/२ दूधात कस्टर्ड पावडर घालून छान मिक्स करा.
- 3
दूधाचा छान उकळी आली की त्यात साखर घाला.
- 4
नंतर त्यात तयार पेस्ट घालून छान मिक्स करा.
- 5
मंद आचेवर एकसारखे ढवळावे.
- 6
नंतर तयार कस्टर्डचे मिश्रण घालावे. एकसारखे छान ढवळत रहावे. नाहीतर गुठळ्या होऊ शकतात.
- 7
मिश्रण थोडे दाटसर झाले की त्यात वेलचीपूड, केसर, सुकामेवा,टुटीफ्रुटी घालून छान मिक्स करावे. १० मि. आणखी शिजवून घ्यावे.
- 8
फ्रिजमध्ये थंड करुन सर्व्ह करावे.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या