कारले कांदा कुरकुरे चिवडा:औषधी (Karle Kanda Chivda Recipe In Marathi)

#VSM:मी कारले सुकवणी,कांदा सुकवणी आणि लसूण सुकवणी केली आहे ती रेसिपी पोस्ट केले आहे, आणि आणखीन पण आपण पाले भाज्या,प्पापड ,सांडगे वगेरे सुकवून वर्ष भर साठवून उपयोग करू शकतो. मी हा औषधी कारले चिवडा बनविला आहे तो वरण भात सोबत आमटी भात सोबत खिचडी सोबत तोंडी लाऊन खाऊ शकतो डायबिटीस कंट्रोल साठी अती उत्तम आहे.असा चिवडा बनवून प्रवासात पण घेऊन गेले तर हरकत नाही कारण फार टेस्टी लागतो.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम तेल गरम करावे आणि नंतर मंद आचेवर कारले कांदा चीपस तळून घ्यावेत, आणि नंतर काजू, शेंगदाणे तळून घ्यावेत
- 2
आता फोडणी करिता पसरट टोपात त्यातल गरम तेल दोन चमचे घेऊन तेल गरम करावे नंतर प्रथम राई फोडणीला घालून तडतडली की त्यात कडीपत्ता लालमिरच्या घालून छान परतून घ्यावे नंतर त्यात तळून ठेवलेले कारले, काजू, शेंगदाणे घालावे आणि नंतर त्यात सगळे मसाले घालून हलवून घ्यावे अगदी शेवटी मीठ, लसूण पावडर, कांदे घालून हलवून घ्यावे (कांदे चिपस जास्त हलवू नका कारण ते फार हलके अस्तात) टेस्टी चीवडा तयार आहे. एअर टाईट का चेची बरणी त भरून ठेवावे.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)