आंबोळी ऑम्लेट,आणी अँपल माॅकटेल (amboli amlet ani apple mocktail recipe in marathi)

Rohini's Recipe marathi
Rohini's Recipe marathi @cook_20091722

आंबोळी ऑम्लेट,आणी अँपल माॅकटेल (amboli amlet ani apple mocktail recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीआंबोळी चे पीठ
  2. 1अंड
  3. 2/3हिरवी मिरची,थोडी कोथिंबीर
  4. 1/2 इंचआल
  5. 5/6लसून पाकळ्या
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1कांदा बारीक चिरलेला
  8. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  9. 1 टीस्पूनशेजवान चटणी
  10. 4/5 टीस्पूनटोमॅटो सॉस
  11. 1चीज क्युब
  12. चवीनुसारमीठ
  13. माॅकटेल साहित्य
  14. 1 वाटीअँपल चे बारीक केलेले तुकडे
  15. 1/2 वाटीमध
  16. 1/2 टीस्पूनदालचीनी पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम आंबोळीचे पीठ डोशाचा पीठाप्रमाणे भिजवून घेणे व दहा मिनिट झाकून ठेवावे (टीप = इथे आंबोळी चे पीठ दळून आणलेले घेतले आहे आबोळी पीठासाठी 1 कीलो तांदूळ,50ग्रॅम उडीद डाळ,20ग्रॅम मेथी दाणे असे प्रमाण घेवून दळून आणलेले आहे)

  2. 2

    आबोळी पीठ भिजे पर्यंत मिरचीचा खरडा करून घेणे त्यासाठी आल,लसूण,हिरवी मिरची,कोथिंबीर हे सर्व मिक्स मधे जाडसर वाटून घेणे व नंतर वाटी मधे अंड फोडून घ्यावे व त्यामध्ये मिरचीचा खरडा हळद व मीठ घालून अंड फेटून घ्यावे

  3. 3

    दहा मिनिटाने आंबोळी करण्यासाठी गॅसवरती डोसा तवा ठेवून त्यावर आंबोळी घालावी व नंतर त्यावर फेटले ले अंड घालावे अंड आंबोळीवर व्यवस्थित पसरवून घ्यावे

  4. 4

    व 4/5मिनिटाने आंबोळी पलटी करून दोन्ही बाजूंनी फ्राय करून प्लेट मधे काढून घ्यावे

  5. 5

    नंतर पॅन मधे तेल घालून त्यामधे कांदा घालून परतून घ्यावे व नंतर त्यामध्ये टोमॅटो व शेजवान चटणी तसेच टोमॅटो सॉस घालून चवीनुसार मीठ घालून टोमॅटो मऊ होई पर्यंत परतून घ्यावे

  6. 6

    नंतर परतलेला कांदा टोमॅटो ऑम्लेट वरती घालावे व त्यावर वरून कोथिंबीर घालून चिज किसून घालावे आशा रितीने आपले आंबोळी ऑम्लेट तयार झाले

  7. 7

    माॅकटेल करण्यासाठी ज्यूस चा भांड्यात apple चे तुकडे घालून त्यामध्ये 1/2टीस्पून दालचीनी पावडर व 1/2वाटी मधातील थोडे मध घालावे व(उरलेले मध माॅकटेल सर्व्ह करताना घालावे) 1/2ग्लास पाणी घालून मिक्सर मधे 5/6 मिनिटे फिरवून घ्या

  8. 8

    व नंतर माॅकटेल सर्व्ह करण्यासाठी एका ग्लासत 3/4आईसक्युब घाला वनंतर त्यामधे मिक्स मधे फिरवून घेतलेले apple व उरलेला मध घालून पिण्यासाठी माॅकटेल सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini's Recipe marathi
Rohini's Recipe marathi @cook_20091722
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes