बटाट्याचा कीस

Rohini's Recipe marathi
Rohini's Recipe marathi @cook_20091722

उन्हाळा आला की वाळवण पदार्थ करण्याचे वेध लागतात मग कुरडई काय पापड्या,सांडगे,बटाट्याचे वेफर्स,बटाट्याचा कीस काय हे सगळ आमचा लहानपणी आई करयची मग ते अंगणात सुकायला ठेवायची आणि आम्हा भावंडांना काठी घेवून राखण करायला बसवायची मग आम्ही थोडी ओलसर असलेली कुरडई ,साबुदाणाचा पापड,बटाट्याचा कीसआईला चोरून खायचो. पण कही म्हणा ओलसर असताना ह्याची जी काय भारी चव लागायची ती अजूनही जीभेवर आहे.पण अता अस खायला होत नाही कारण करून एवढे थकतो की खायला विसरतो .दरवर्षी हे सगळ करताना नकळत बालपणीचा आठवणी एखाद्या चित्रपटा प्रमाणे दिसू लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2कीलो बटाटे
  2. 10 ग्रॅमतुरटी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम बटाटे स्वच्छ धुवून साल काढून पाण्यात टाकून ठेवावे

  2. 2

    व नंतर एका मोठ्या पातेल्यात पाणी घालून त्यामध्ये तुरटी घालून घेणे

  3. 3

    व नंतर सालं काढून घेतलेले बटाटे मोठ्या दाताचा किसनीने किसून घ्यावे कींवा तुमचाकडे फुडप्रोसेसर असेल तर त्यामधे सुद्धा किसून घेवू शकता.किसलेले बटाटे तुरटीचा पाण्यात टाकून रात्रभर तसेच झाकून ठेवावे

  4. 4

    नतर सकाळी कीस दोन पाण्यात स्वच्छ धुवून घेणे व गॅसवर मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा व त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे

  5. 5

    पाण्याला उकळी आली की त्यामधे किसलेले बटाटे घालून 3/4मिनटे झाकण ठेवून शिजवून घेणे

  6. 6

    नंतर 3मिनिटे झाकण काढून घ्यावे व शिजलेला बटाट्याचा कीस एका चाळणीत काढून त्यातील पूर्ण पाणी निथळून घ्यावे व कीस प्लास्टिकच्या पेपर वरती 2दिवस उन्हात कडकडीत सुकवून घ्यावे

  7. 7

    व तुम्हाला हवे असेल तेव्हा तेलामधे तळून खाण्यासाठी सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini's Recipe marathi
Rohini's Recipe marathi @cook_20091722
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes