अमृतफळ (amrutfal recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#shravanqueen
श्रावणात गोडधोड पदार्थांची रेलचेल सुरूच असते, त्यात ऊद्या नारळीपोर्णिमा , मस्त पारंपारिक नारळीभात, नारळाच्या वड्यांचा सुगंध घरोघरी पसरणार, पण कधीतरी काही वेगळं करण्याची ईच्छा होते अन त्यातुन जन्माला येते हे अमृतफळ,
कसे करायचे ते बघुयात.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

15-20 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतांदळाचे पीठ
  2. 1 कपओल्या नारळाचा कीस किंवा पातळ काप
  3. 3/4 कपदही
  4. 1 पिंचमीठ
  5. 1 कपसाखर
  6. 4ते 5 केशर काड्या
  7. आवडीनुसार खाण्याचा रंग
  8. 1 टीस्पूनसुकामेव्याचे काप

कुकिंग सूचना

15-20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदळाचे पिठ, खोबरे किस किंवा खोबर्‍याचे बारीक काप,मीठ, नखभर खाण्याचा रंग व दही घालून सरबरीत वाटून घ्यावे.आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी घालून भज्याच्या पिठापेक्षा थोडे घट्टसर वाटून घ्यावे.

  2. 2

    एकीकडे गॅस'वर साखरेचा पाक तयार करायला ठेवावा.आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे. त्यानुसार साखरेमध्ये तसे पाणी घालून पाक तयार करावा. पाकामध्ये केशर काड्या व खाण्याचा नखभर रंग ऍड करावा.

  3. 3

    दुसरीकडे कढईमध्ये तूप घालून गरम करायला ठेवावे व वाटलेल्या मिश्रणाचे चे छोटे-छोटे भज्या सारखे खमंग तळून घ्यावेत व हे तळल्यानंतर पाकामध्ये सोडावे. साधारण पाच ते दहा मिनिटात हे पाकामध्ये मुरल्यानंतर एका बोल मध्ये काढून त्यावर सुकामेवा घालावा, अमृतफळ तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

Similar Recipes