कुकिंग सूचना
- 1
बेसन, बारीक रवा आणि तूप एकत्र करणे.
- 2
मिश्रण चांगले मिक्स करणे थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घेणे. हे पीठ १५ ते २० मिनिटे झाकून ठेवणे.
- 3
एका कढईत दोन कप साखर आणि पाऊण कप पाणी घालून पाक करत ठेवणे.पाकाला उकळी आली की त्यात चिमूटभर केसरी रंग टाकणे व एक तारी पाक तयार करणे.
- 4
१५- २० मिनिटांनी झाकून ठेवलेले पीठ चांगले मळून घेणे. त्याच्या जाडसर पुर्या लाटून घेणे. व मिडीअम गॕसवर तेलात खरपूस तळून घेणे.
- 5
सर्व पुर्या तळून झाल्या की त्या पूर्ण थंड झाल्या की त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला रवाळ फिरवून घेणे.
- 6
त्या मिश्रणात वेलची पावडर व मनूका घालणे.नंतर त्यात एकदम गार झालेला पाक थोडा थोडा करून घालणे. एकदम सगळा पाक ओतू नये. नाहीतर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते.
- 7
सर्व साहित्य चांगले मिक्स करून घेणे व लाडू वळणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11857555















टिप्पण्या