चवाचे घावणे (ghavane recipe in marathi)

कोकणात तांदूळ,गूळ आणि नारळ यापासून अगणित पदार्थ बनवले जातात.त्यातलाच एक विशेष म्हणजे चवाचे घावणे.चव म्हणजे नारळ गुळाचे सारण.ते मसाला दोशाप्रमाणे घवणाच्या आत भरून गुंडाळी केली जाते. देशी रोलच म्हणानात.
'बच्चे तो बच्चे, बाप रे बाप' म्हणजे लहान आणि मोठे सगळ्यांनाच हे चवाचे घावणे खूप आवडतात.नारळी पौर्णिमेला सकाळी नाश्त्याला हा प्रकार माझ्याकडे असतोच, कारण माझया अहोंचाही हा आवडता प्रकार आहे.
घ्या तर साहित्य जमवायला.

कुकिंग सूचना
- 1
खोबर आणि गूळ एकत्र शिजवून घ्या.खसखस आणि जायफळ पूड घालून थंड करा.
- 2
तांदळाचे पीठ पाणी घालून डोशाच्या पिठापेक्षा पातळ करा.मीठ घाला.गुठळ्या राहू देऊ नका.
- 3
तवा तापवून तूप/तेल घालून पीठ गोलाकार पातळ पसरवा.वरून सुकले की परतवा.
- 4
ताटलीत काढून त्यावर सारण एका लाईनमध्ये ठेवून गुंडाळी कता.
- 5
गरमागरम आस्वाद घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या