स्प्राऊट ब्लास्ट लड्डू (sprout blast ladoo recipe in marathi)

#लाडू
मुग म्हंटलं की पौष्टिकता डोळ्यासमोर येते,
मूग कसेही असो हे खूप जास्त आरोग्याला चांगले असतात,
त्यात मोड आलेले असले की ते अजून जास्त गुणांनी भरलेले असतात, म्हणून आरोग्य ला फायदेशीर असतात,
ज्वर आणि बद्धकोष्टता या रोगांसाठी मूग अतिशय फायदेशीर आहेत,
कॅल्शियम, आयरण, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि विटामिन्स त्याची मात्रा डबल असते,
तसेही अंकुरित केलेल्या कडधान्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत पाचन क्रिया आपली सुधारते,
भरपूर फायबर असल्याने पोट खूप वेळपर्यंत भरल्यासारखं वाटते, त्यामुळे आपण अतिरिक्त पदार्थ खात नाही,
त्यामुळे जास्तीचं अन्न आपण खाण्यापासून वाचतो,
भरपूर फायबर युक्त असल्याने पोट नॅचरली साफ होते,
आणि लाडू मध्ये स्पायसेस आपण घातलेले आहेत त्याचे फायदे या पावसाळ्याच्या वातावरणात आपल्या आरोग्याला खूप जास्त चांगले आहेत,, कफ, सर्दी यासाठी फायदेशीर आहे,
बदाम आरोग्याला चांगले आहेत हे सगळ्यांना माहीतच आहे,,,
असे हे अंकुरित मुगाचे लाडू जर आपण ट्राय केले आपल्या आरोग्याला चांगलेच आहे,
आणि कोणाला वाटत असेल कि हे लाडू कसे लागतील पण माझ्यावर विश्वास ठेवा हे लाडू अतिशय चविला सुंदर झालेले आहेत करून बघा,,
आधी माझ्या मुलांना सांगितले नाही मी हे लाडू कशाचे आहे पण जेव्हा त्यांनी खाल्ले त्यांना वाटलं पण नाही की ही अंकुरित मूग चे लाडू आहे,
आणि त्यांना पण खूप जास्त आवडले,
म्हणून असे हे गुणांनी आणि पौष्टिकताने भरपूर असलेले लाडू करायला काही हरकत नाही

कुकिंग सूचना
- 1
मुग 8 तास पाण्यात भिजत घालून नंतर त्याला कपड्यांमध्ये दोन दिवस बांधून ठेवावेत, म्हणजे फोटो दाखवल्याप्रमाणे मोड येतील, आता मुगाला मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत, त्यामध्ये क्रीम आणि दूध घालून परत मिक्सरमधून फिरवावे,
- 2
फ्राईंग पॅनमध्ये तूप घालून त्यामध्ये मिक्सरमधून काढलेले मूग आणि क्रीमचे मिश्रण घालावे, इथे तुपाचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात, आणि त्याला चांगले परतत राहवे, इथे मंद गॅसवर हे आपल्याला परतून घ्यायचे आहे, दहा ते पंधरा मिनिटं लागतील याला, जोपर्यंत त्याचा ओलावा कमी होऊन मूगाचे मिश्रण कोरडे होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचे आहे,
- 3
आता यामध्ये खोब्रा किस, बदामाची मिक्सरमधून काढलेली पूड, मिल्क पावडर ऍड करून चांगले दोन ते तीन मिनिट परतून घ्यावे, हे सर्व मंद गॅसवर करायचे आहे, आता या मिश्रणाला थंड होऊ द्यावे,
- 4
आता मिक्सरच्या पॉट मध्ये लवंग, विलायची, काळीमिरी, कलमी पावडर, जाळफळ घालून त्यामध्ये साखर घालावी आणि ते मिक्सर मधून बारीक करून घ्यावे,
- 5
मोडलेल्या मुगाच्या थंड झालेल्या मिश्रणामध्ये मिक्सर मधून काढलेले पिठीसाखर, मसाल्याचे मिश्रण मिक्स करून घ्यावे, आता त्यामध्ये कंडेन्स मिल्क घालावे,
- 6
आता याला चांगले मिक्स करून घ्यावे इथे मिल्कमेड तुम्ही कमी-जास्त करू शकता जसे तुम्हाला पाहिजेत तसे, इथे मिल्कमेड च्या जागी तुम्ही तूप पण युज करू शकता, आता या मिश्रणाचे लाडू वळून घ्यावे,
- 7
अंकुरित मुगाचे लाडू तयार आहेत, त्याला वरून काळा मनुका आणि चेरी लावून गार्निश केलेले आहे, खूप जास्त पौष्टिक आहेत हे लाडू, करून बघा, खुप छान टेस्टी होतात हे,,
- 8
हे लाडू तीन दिवस टिकतील, नंतर फ्रीजमध्ये ठेवावे, टीकव्हायेचे तर त्यात खवा घाला, क्रीम आणि दूध नका घालू,
- 9
Similar Recipes
More Recipes
- मुग डाळीचे पौष्टीक लाडू (moong dal ladoo recipe in marathi)
- मसाल्याची भरली कारली(अजिबात कडू न लागणारी) (masalychi bharali karali recipe in marathi)
- ढोकळा ए सालसा (dhokla recipe in marathi)
- डेसिकेटेड कोकोनट इन्स्टंट लड्डू (desiccated coconut instant ladoo recipe in marathi)
- कृष्णन उंडी (krishnan undi recipe in marathi)

टिप्पण्या (10)