कुकिंग सूचना
- 1
एका पॉट मध्ये नुडल्स 2 ग्लास पाणी, आवश्यकतेनुसार मीठ, 1 टीस्पून तेल घालून गैस वर बॉईल करायला ठेवा. 5-10 मिनीटं झाल्यावर गैस बन्द करू. आणि नुडल्स चाळणीत काढून घेऊ. नूडल्सच पाणी निघेपर्यंत तर सर्वे वेजिटेबल कापुन घेऊ.
- 2
मग कांदा, कोबी, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक कापुन घेऊ.
- 3
एका पॅनमध्ये 3 टीस्पून तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात लसूण, अद्रक, हिरवी मिरची टाकुन परतून घ्यावे. मग त्यात कोबी, कांदा, ढोबळी मिरची आणि कोथिंबीर च्या काड्या घालुन 4-5 मिनिटं परतुन घ्यावे.
- 4
मग त्यात मिरची पावडर, आवश्यकतेनुसार मीठ, टोमॅटो सॉस, सोया सॉस, विनिगर टाकुन मिश्रण एकजीव करून घ्यावे. 2-3 मिनिटं परतुन घ्या. मग त्यात नुडल्स टाका.
- 5
नुडल्स एकजीव करुन घ्या. एकजीव झाल्यावर मग कोथिंबिर टाका. आणि मिश्रण एकजीव करून घ्या. 4-5 मिनिटं स्लो गैस वर ठेवा. 4-5 मिनिटं झाल्यावर गैस बन्द करा.
- 6
नुडल्स एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्हाला हवे तसे डेकोरेट करा.
Top Search in
Similar Recipes
More Recipes




















टिप्पण्या (2)