फुलकोबी तुरीच्या दाण्याचा पुलाव : (fulgobi turichya danyacha cauliflower pulao recipe in marathi)

फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा स्वादिष्ट भात/कॉलीफ्लॉवर पुलाव :
#कॉलीफ्लॉवर
#GA4
#week10
वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. चला तर जाणून घेऊ या चमचमीत रुचकर ,स्वादिष्ट फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा रूचकर भात/ कॉलीफ्लॉवर पुलावची साधीसोपी रेसिपी.

कुकिंग सूचना
- 1
स्टेप १: प्रथम तांदूळ स्वच्छ करून आधी १५ मिनिटे तांदूळ धुवून निथळत ठेवा.
- 2
स्टेप २: नंतर गॅस चालू करून त्यावर कुकर ठेवून तुपाची फोडणी करा. त्यात मोहरी, जीरे तडतडू द्या.नंतर लसूण,कांदा,तुपात कांदा चुरचुरीत परतून घ्या. आणि त्यात मिरे, दालचिनी, तेजपत्ता, लवंग, मोठी विलायची, चक्रीफुल, तांदूळ, तुरीचे हिरवे दाणे, फरसबी टाकून परतावे.
- 3
स्टेप ३: आता त्यात टोमॅटो, कोबी, काजू, बदामाचे तुकडे, धने पावडर, गरम मसाला घालून परतून घ्या. आता कुकरचे झाकण बंद करून १ शिट्टी होऊ द्या.
- 4
- 5
स्टेप ४: तयार झाला आपला फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा स्वादिष्ट भात/ कॉलीफ्लॉवर पुलाव. हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. जर हा भात आवडल्यास नक्की करून बघा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)