तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi)

#मकर
संक्रांत सणाला किंवा थंडीच्या दिवसात हा मेनू खास महाराष्ट्रात वेगळ्या भागात केला जातो .आमच्या शेतकरी राजाचा तर हा न्याहारीचा मेनू आहे. अगदी रोज शेतात हा मेनू नेला जातो. ऋतु बदलात पौष्टिक आहार घ्यावा म्हणुन आपल्या संस्कृती मध्ये कितीतरी सण आहेत.ताया पैकी संक्रांत सण यात तिळ,गुळ,बाजरी फळभाज्या तसेच शेंगभाज्या वापरून जेवण बनवले जाते.आज मी असाच एक मेनू बनवला आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि.

कुकिंग सूचना
- 1
कढई गरम करून त्यात मिडीयम फ्लेमवर तिळ खरपूस भाजून घ्या.
- 2
मिक्सर मध्ये घालून त्यात तिखट,मीठ,हिंग,जीरे,लसूण घालून चटणी फिरवून घ्या.
- 3
बाजरीच्या पिठामधे मीठ घालून गरजेनूसार पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे.
- 4
चांगले मसून घ्या तवा गरम करा.आता पिठाचे दोन सारखे गोळे करा.
- 5
पसरट भांडे(परात किंवा ताट वापरावे) खाली ताटात पीठ पसरवा त्यावर गोळा गोल करून ठेवा भाकरी हाताने थापून घ्या.
- 6
तव्यावर भाकरी दोन्ही हाताने घालून घ्या व त्यावर पाणी घालून फिरवून घ्याआया भाकरी मिडीयम फ्लेमवर दिड ये दोन मीनीट भाजून घ्याउलट बाजूने पण तीन ते चार मिनिट भाजा.
- 7
आता तवा काढून गॅसवर भाकरी सराट्यावर धरून शेका गोल फिरवून म्हणजे भाकरीला पुर्ण मांडा येतो.याच प्रमाणे दूसरी भाकरी पण करून घेवूत.
- 8
आणी चटणी सोबत सर्व्ह करा चटणी दह्यात किंवा तेल घालून खाल्ली जाते.
Top Search in
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या