फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)

#dr
#फोडणीचे वरण
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा, तूरडाळीबरोबरच इतर डाळींचा वापर करून केला जाणारा पदार्थ म्सणजे डाळभात, वरणभात. कोणत्याही आजारात पचनास हलकं म्हणूनही मूगाच्या डाळीचं वरण भाताबरोबर दिलं जातं. पण कोणत्याही व्हेज जेवणात या वरणाचे विविध प्रकार केले जातात आणि जेवणाची रंगत वाढवली जाते. मीसुद्धा विविध प्रकारे वरण करते. आजही अगदी साध्या पद्धतीचे फोडणीचे मी केले आहे, पाहूया रेसिपी.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम दोन्ही डाळी स्वच्छ धुवून थोडे जीरे टाकून कुकरला शिजवून घ्यावी.लसूण, खोबरे, मिरचीचे तुकडे, थोडे जीरे मिक्सरवर वाटून घ्यावे.
- 2
नंतर एका पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये हिंग, थोडे जीरे, मोहरी, कडीपत्ता घालावा, तडतडला की वाटलेले वाटण घालावे, मिनिटभर परतवून हळद घालणे.
- 3
आता यामध्ये शिजलेली डाळ घालणे.मीठ घालणे. आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळू द्यावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.भाताबरोबर सर्व्ह करावे.साधं वरण ज्यांना आवडत नाही त्यांना हे फोडणीचे वरण नक्की आवडेल.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या