कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)

#Trending_recipe
कोबी..पत्ताकोबी..जगभरातील किचन मधला हुकमाचा एक्का...या भाजीचे वेगवेगळ्या पद्धतीने केलेले variations आपल्याला बघायला मिळतात...एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतात ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते..अर्थातच त्यामुळे आपण या एकाच भाजीच्या विविध स्वाद,विविध चवी चाखू शकतो..त्यातीलच चणाडाळ घालून केलेली कोबीची भाजी माझी अतिशय आवडीची..चला तर मग या सोप्या,झटपट,बिना कांदालसणाच्या पण अतिशय खमंग अशा कोबीच्या भाजीच्या रेसिपीकडे..😋😋

कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणाडाळ व्यवस्थित धुवुन तीन ते चार तास भिजत ठेवा. नंतर सर्व साहित्य जमा करून घ्या.कोबी लांब आणि पातळ चिरून घ्या..आलं,मिरच्या, कोथिंबीर चिरुन घ्या.
- 2
आता कढईत तेल गरम करा तेल गरम झाले की त्यामध्ये हे जीरे मोहरी घाला. जीरे मोहरी तडतडल्यावर हिंग.मिरच्यांचे तुकडे.कढीपत्ता कोथिंबीर.आल्याचे तुकडे आणि हळद घालून खमंग फोडणी करून घ्या. नंतर यामध्ये भिजवलेली चणाडाळ निथळून व्यवस्थित मिक्स करा आणि छान पैकी लालसर होईपर्यंत परतून घ्या.आता यामध्ये कोबी घालून व्यवस्थित परता आणि भाजी मध्ये मीठ साखर घालून परत व्यवस्थित परतून घ्या. नंतर भाजीला चार ते पाच वाफा काढून भाजी चांगली शिजवून घ्या.
- 3
तयार झाली आपली कोबीची भाजी आता या भाजीवर कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून गरमागरम पोळी बरोबर सर्व्ह करा.
- 4
- 5
Top Search in
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या