लाल भोपळयाचे घारगे (lal bhoplyache gharge recipe in marathi)

Chhaya Chatterjee @chhaya14
महाराष्ट्रात सणवार असले की घारगे केले जातात. भोपळयाचे घारगे हे सर्वांना खूप आवडतात. कोकणात तर अतिशय प्रसिद्ध आहे.
लाल भोपळयाचे घारगे (lal bhoplyache gharge recipe in marathi)
महाराष्ट्रात सणवार असले की घारगे केले जातात. भोपळयाचे घारगे हे सर्वांना खूप आवडतात. कोकणात तर अतिशय प्रसिद्ध आहे.
कुकिंग सूचना
- 1
भोपळा किसून घ्यावा व त्यात गुळ घालून मध्यम आचेवर 7-8 मि.शिजवून घ्यावा व नंतर गॅस बंद करून थंड करण्यास ठेवावेत. पाणी घालू नये.
- 2
2 कप कणीक, तांदळाचे पीठ, हळद, वेलची पावडर, जायफळ पावडर, बडीशेप पावडर, मीठ सर्व एकत्र करून त्यात भोपळ्याचे मिश्रण घालावे व पीठ मळून घ्यावे. पाणी घालू नये. गरज वाटली तर जरासे घालावे.
- 3
पीठ मळून त्यावर जरा तेल लावून 10 मि.झाकून ठेवून दयावे.
- 4
10 मि. तयार पीठाचे छोटे छोटे गोळे करून जाडसर पुरया करून घ्यावेत व गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावेत. घारगे तयार.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15433664

टिप्पण्या (2)