प्रॉन्स काळीमिरी (prawns kalimiri recipe in marathi)

#mfr वीकएंड पार्टी साठी बेस्ट डिश म्हणजे "प्रॉन्स काळीमिरी". प्रॉन्स basically माझे favorite आहेत आणि त्यातली हि पाककृती तर खूपच आवडते मला.
प्रॉन्स काळीमिरी (prawns kalimiri recipe in marathi)
#mfr वीकएंड पार्टी साठी बेस्ट डिश म्हणजे "प्रॉन्स काळीमिरी". प्रॉन्स basically माझे favorite आहेत आणि त्यातली हि पाककृती तर खूपच आवडते मला.
कुकिंग सूचना
- 1
मॅरिनेशन साठी :
१ बाउल साफ केले प्रॉन्स मध्ये २ चमचे पुदिना - कोथिंबीर पेस्ट, २ चमचे घरचा मसाला, पाव चमचा हळद, दीड चमचा मीठ, अर्ध्या लिंबाचा रस घालून २-३ तासांसाठी मॅरीनेट करत ठेवायचे. - 2
प्रॉन्स काळीमिरी बनवण्यासाठी : २ मोठे कांदे चिरून घेतले. सोबत ८-१० कढीपत्ता पाने, २-३ लाल सुकी / बेडगी मिरच्या, २ इंच दालचिनी, ३ हिरव्या वेलच्या, ३ लवंगा, २ चमचे आलं - लसूण पेस्ट आणि २५-३० अख्खी काळीमिरी ची खलबत्त्यात पावडर कुटून घेतली.
- 3
पॅनवर २ चमचे खाद्यतेल तापवून घ्यायचं. तेल तापल्यावर २ इंच दालचिनी तुकडा, ३ हिरव्या वेलच्या, ३ लवंगा, २-३ लाल सुकी / बेडगी मिरच्या तोडून तेलावर सोडायच्या. थोडा वेळ तेलावर परतून घ्यायचं. यावर २ मोठे चिरलेले कांदे घालायचे आणि मऊ होईपर्यँत शिजवायचे. कांदा शिजला कि अर्धी कढीपत्ता पाने ऍड करायची. चमचे आलं - लसूण पेस्ट ऍड करायची. आलं - लसूण पेस्ट चा सुगंध दरवळेपर्यंत मिश्रण तव्यावर परतून घ्यायचं.
- 4
अर्धा चमचा घरचा लाल मसाला आणि पाव चमचा हळद घालायची. मॅरीनेट करताना मीठ घातलेले असल्याने बेताने / चवीनुसार मीठ घालायचं.
- 5
आता यात मॅरीनेट केलेले प्रॉन्स ऍड करायचे. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता या पाककृती चा महत्वाचा घटक म्हणजे २५-३० अख्खी काळीमिरी ची खलबत्त्यात कुटून घेतलेली अर्धी पावडर ऍड करायची. प्रॉन्स शिजेपर्यंत मिश्रण तव्यावर परतत राहायचं.
- 6
प्रॉन्स शिजत आले कि उरलेली काळीमिरी पावडर ऍड करायची. उरलेली कढीपत्ता पाने वरून ऍड करून एकदा मिश्रण ढवळून घ्यायचं. प्रॉन्स छान शिजले कि झाकण ठेवून प्रॉन्स मध्ये वाफ मुरू द्यायची. सर्व करताना आवडत असल्यास लिंबाचा रस पिळून किंवा आहे असेच प्रॉन्स काळीमिरी खायला घ्यायचे :)
~ सुप्रिया घुडे
Top Search in
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या (2)