सुकट घालून कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)

kalpana Koturkar @kalpanakoturkar06
सुकट घालून कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सुकट स्वच्छ करून ५-१० मिनिट भिजत ठेवा. सुकट भिजत आहे तोपर्यंत कांद्याची पात बारीक चिरून घ्या.
- 2
गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाका. तेल गरम झाले की त्यात बारीक चिरलेला कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. कांदा ब्राऊन झाला की त्यात ठेचलेला लसूण टाका.लसूण २-३ मिनिट परतून झाला की गॅस मंद आचेवर ठेवून त्यात हळद, लाल मिरची पावडर व मीठ टाकून पुन्हा एकदा चांगले परतून घ्या.
- 3
मसाला परतून झाला की त्यामध्ये भिजत ठेवलेले सुकट पिळुन घ्या व कढईत टाकून पुन्हा एकदा चांगलं परतून घ्या व ५-६ मिनिटे वाफवून घ्या. वाफ आली की त्यामध्ये कांद्याची पात टाकून चांगलं परतून घ्या व १/२ कप पाणी घालून ५-१० मिनिटे शिजवून घ्या.
- 4
गरम गरम कांद्याच्या पातीचे सुकट भाकरी किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15790074



टिप्पण्या