तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

Rupali Dalvi @rupalidalvi
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ धुवून एक तास भिजवून व बारीक वाटून घ्यावे.
- 2
एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवावे त्यात चमचाभर तुप टाकावे. तुप विरघळल्यावर त्यात बारीक केलेले तांदूळ घालावे.
- 3
तांदूळ घातल्यावर पाणी सारखे हलवावे म्हणजे तांदूळ शिजत आल्यावर गोळे होणार नाही व खाली लागणार ही नाही. तांदूळ पेस्ट शिजल्यावर त्यात दूध घालून हलवून घ्या.
- 4
दूध घातल्यावर उकळी येऊ दयावी. उकळी आल्यावर त्यात काजू, बदाम, चारोळे, किशमीश, साखर, नारळाचा किस,विलायची पुड घालावी. सर्व चांगल्याप्रकारे हलवून घ्या.
- 5
एक उकळी आल्यावर त्यात तुप घालावे व चीमुटभर मीठ घालून मंद आचेवर ठेवावे. गँस बंद करून खीर एका वाटीत घेऊन गरमागरम खाण्यासाठी तयार.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15848587














टिप्पण्या