रोझ पिंक मोदक (Rose Pink Modak Recipe In Marathi)
(खास दिप अमावस्ये निमित्त नैवेद्य)
रोझ पिंक मोदक (Rose Pink Modak Recipe In Marathi)
(खास दिप अमावस्ये निमित्त नैवेद्य)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात १ कप आणि १/२ कप पाणी घरम करून घ्यावे.त्यात १ चमचा तूप आणि चिमूटभर मीठ घालावे.आता त्यात १ कप आणि १/२ कप मोदकाचे पीठ घालून ते हलवून नंतर गॕस बंद करून घ्यावा. आता ते पीठ ५ मिनिटे झाकून ठेवावे.
- 2
आता चव करण्यासाठीः- एका कढईत १ मोठा चमचा तूप घालून त्यात नारळाचा खिस आणि बारीक कापलेला गुळ घालावा. आता ते मिश्रण छान एकत्र झाले की त्यात सुखामेवा आणि वेलची जायफळची पुड घालावी. आता छान परतून घ्यावे. आणि ५ मिनिटांनी गॕस बंद करावा.
- 3
आता ५ मिनिटांनी ते पीठ बाहेर काढून आधी नीट मळून घ्यावे.आता त्यात थोडे रोझ पिंक लिक्विड शिंपडून छान परत मळून घ्यावे.
- 4
आता आपण उकडीचे मोदक करतो तसेच करून घ्यावे. (रोझ पिंक लिक्विड) ला छान अगदी गुलाबा सारखा वास येतो. जास्त शिंपडू नये.
- 5
आता मोदक वळून झाले की स्टीमर मध्ये घालून १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या.
- 6
अश्या प्रकारे रोझ पिंक मोदक तयार आहेत.
Similar Recipes
More Recipes







टिप्पण्या (4)