पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)

#PRN
पराठे हे माझ्या आवडीचे म्हणून वेगवेगळ्या चवीचे करायला आवडतात. यावेळेला पनीर स्टफ्ड पराठा केला.
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#PRN
पराठे हे माझ्या आवडीचे म्हणून वेगवेगळ्या चवीचे करायला आवडतात. यावेळेला पनीर स्टफ्ड पराठा केला.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळ्याची तयारी करावी. पनीर बारीक क्रश करून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले घालावे- लाल तिखट, हिरवी मिरची पेस्ट, चाट मसाला, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ आणि कोथिंबीर.
- 2
आता हे सर्व मिक्स करून घ्यावे. तिखटाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार करू शकता. आता त्याच बरोबरीने गव्हाचे पीठ घेऊन गोळा मळून घ्यावा. आता छोटे गोळे करून घ्यावेत. त्यानंतर शेवटी पोळी लाटून घ्यावी.
- 3
आता यामध्ये 3 टेबलस्पून पनीर मिक्स घालावे आणि छोटा गोळा करून पोळी लाटून घ्यावी.
- 4
आता तवा गरम करून त्यावर थोडेसे सर्व बाजूंनी तेल घालून लाटलेली पोळी त्यावर घालावी आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे. बाजूलाही तेल सर्व बाजूंनी घालावे.
- 5
आता आपल्या पनीर पराठा तयार झाला. गरम गरम सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या (6)