प्लम फ्रूट केक (Plum Fruit Cake Recipe In Marathi)

#PR
गव्हाचं पीठ आणि गुळाचा प्लम फ्रूट केक...
थंडीत जसे इकडे आपण डींक हळीवाचे लाडू खातो तसेच थंड प्रदेशातील लोकं काय बरं खात असावेत ? भरपूर सुकामेवा , दारू आणि काकवीमध्ये भिजवून मंदाग्नीवर भाजलेले ख्रिसमस फ्रूट केक्स....
प्लम फ्रूट केक हा एक उत्तम केक आहे जो फळे आणि सुक्या मेव्यापासून बनवला जातो. हा केक बनवण्यासाठी प्लम्सचा वापर केला जात नसला तरी वाळलेल्या बेरी आणि मनुका वापरल्यामुळे याला प्लम केक म्हणतात....
आज आपण बघुया संत्राच्या रसात भिजवलेले ड्रायफ्रुटस तसेच गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा प्लम फ्रूट केक.😋

कुकिंग सूचना
- 1
एका मोठ्या भांड्यात संत्र्याचा रस घ्या, त्यात बेदाणे, मनुके, बदामाचे तुकडे, काजू, अक्रोडाचे तुकडे, टुटी फ्रुटी, खजूराचे तुकडे घालून चांगले मिसळा आणि २-३ तास भिजत ठेवा. तसेच जायफळ, दालचिनी, वेलची, सुकं पावडर घालून मिक्सरमध्ये बारीक मसाला पावडर करून घ्या.
- 2
आता एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये दूध घ्या, त्यात दोन चमचे व्हाईट व्हिनेगर घाला. १० मि. नी दूध फाटले कि तेल, गुळाची पावडर आणि व्हॅनिला इसेन्स घाला. गव्हाचे पीठ बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळणीने चाळून घ्या आणि दुधाच्या मिश्रणात कट फोल्ड पध्दतीने मिक्स करा. आता भिजवलेले ड्रायफ्रुट्स घाला आणि परत कट फोल्ड पध्दतीने मिक्स करा.
- 3
कुकरमध्ये किंवा मोठ्या पातेल्यात दोन कप मीठ तळाशी टाका. त्यावर एक स्टँड ठेवा आणि कमी आचेवर ५५ मिनिटे भाजून घ्यावा.
- 4
टूथपिक घालून चेक करा. टूथपिक क्लिन आली तर तुमचा केक तयार आहे. थोडा थंड होऊ द्या, मग अनमोल्ड करा आणि ताव मारा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)