ज्वारीचे धपाटे (Jwariche Dhapate Recipe In Marathi)

₹GR2
#गावरान रेसिपी चॅलेंज
# ज्वारीचे धपाटे
धपाटे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे खुसखुशीत असे धपाटे मधल्या वेळेस किंवा रात्रीच्या जेवणासाठी एक फुल मिल म्हणून अगदी योग्य प्रकार आहे. पाच ते सहा दिवस राहतात तुम्ही याला प्रवासाला घेऊन जाऊ शकता. आता थंडी असल्यामुळे मी यात मेथी पण टाकली त्याच्यामुळे याचा स्वाद खूपच वेगळा लागतो.

कुकिंग सूचना
- 1
मेथी छान निवडून स्वच्छ धुऊन घ्या आणि बारीक चिरून घ्या. एका परातीत चिरलेली मेथी,धने जिरपूड, मीठ, हळद, डाळीचे पीठ,दही तीळ हे सर्व घालून छान मिळवून एकत्र करून घ्या.
- 2
तात्या ज्वारीचे पीठ घालून छान एकत्र मिक्स करून कोमट पाण्याने पीठ भिजवून घ्या. भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवल्यावर ५ मिनिटं झाकून ठेवा.
- 3
एका पोलपाटावर थोडं ज्वारीचे पीठ भुरभुरून त्यावर भिजवलेल्या पिठाचा गोळा घ्या त्यावर काळे तीळ भिरभिरवा भाकरी जसं हाताने थापतो तसा या धपाटे थापून घ्या.
- 4
हे थापलेले धपाटे गरम तव्यावर हलक तेल सोडून दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्या. गरमागरम धपाटे लोणी दही चटणी याबरोबर सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)