शाही गाजर हलवा (Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)

#SWR हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि हिरव्या मटार ची धमाल असते.. मग घरात काही सण असो या हळदी कुंकू... की गाजराचा हलवा बनलाच..
शाही गाजर हलवा (Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)
#SWR हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि हिरव्या मटार ची धमाल असते.. मग घरात काही सण असो या हळदी कुंकू... की गाजराचा हलवा बनलाच..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाजर स्वच्छ धुवून किसून घ्या. नंतर दुसऱ्या बाजूला गॅस चालू करून त्यावर एका मोठ्या कढईत ३-४ चमचे तूप घालून गाजराचा किस चांगला तुपावर भाजून घ्या.
- 2
नंतर त्यात १ कप उकळून थंड केलेले दूध घालून हे मिश्रण एकजीव करून चमच्याने ५ मिनिटे फिरवून घ्या. आता त्यात १ कप साखर घालून मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून वरून दूध पावडर, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिश्रण एकत्र करून चागले शिजू दया.
- 3
आता वरून खवा कुस्करून घालून चमच्याने फिरवून घ्या. नंतर दुसऱ्या बाजूला सर्व डाय फूट चांगले तुपात भाजून हलव्यात वरून घाला.
- 4
आता वरून तूप घालून मिश्रण झाकून चांगले १५ मिनिटे वाफेवर शिजू दया. तयार गरमागरम शाही गाजर हलवा... तो गरमागरम किंवा फिज मध्ये थंड करून ही सव्हऀ करु शकता.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या