समुद्र मेथीची भाजी / बारीक मेथीची भाजी(Barik Methichi Bhaji Recipe In Marathi)

Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
समुद्र मेथीची भाजी / बारीक मेथीची भाजी(Barik Methichi Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मेथी सात-आठ वेळा पाण्याखाली स्वच्छ धुऊन घ्या म्हणजे त्याच्यातील वाळू निघून जाईल.आता भाजीची मुळे कापून भाजी चिरुन घ्या.
- 2
भाजीला लागणारे सर्व साहित्य एके ठिकाणी एकत्र ठेवा.
- 3
एका कढईत तेल तापत ठेवा. तेल तापले की त्यात मोहरी जीरे, हिंग हळद घालून खमंग फोडणी करा. नंतर त्यामध्ये मिरच्या आले लसूण घालून परतून घ्या. आता फोडणीवर कांदा घालून तो छान परतून घ्या.
- 4
आता बारीक चिरलेली मेथी घालून व्यवस्थित मिक्स करा.झाकण ठेवून भाजीला 1-2 वाफा काढा.
- 5
भाजी शिजत आली की यात मीठ,ओलं खोबरं घालून परतून घ्या आणि परत एक दोन वाफा काढा.ह्या भाजीला शिजायला अजिबात वेळ लागत नाही..भाजी मंद आचेवरच शिजवावी.
- 6
तयार झाली आपली समुद्र मेथीची खमंग चवदार भाजी..गरमागरम भाकरीबरोबर भाजी सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16809473














टिप्पण्या (3)