पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puran Poli And Katachi Amti Recipe In Marathi)

#HR1
#पुरणपोळी_आणि_कटाची_आमटी
#होळी_स्पेशल_रेसिपीस
पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puran Poli And Katachi Amti Recipe In Marathi)
#HR1
#पुरणपोळी_आणि_कटाची_आमटी
#होळी_स्पेशल_रेसिपीस
कुकिंग सूचना
- 1
चणाडाळ दोन तास भिजवून मग कुकरमधे चार शिट्या काढून शिजवून घेतली. मग शिजलेल्या डाळीतले पाणी ज्याला "पुरणाचा कट" म्हणतात ते दुसऱ्या भांड्यात गाळून ठेवले. आणि शिजलेल्या डाळीत तेवढाच गुळ घालून मिक्स करून पुरण सतत ढवळून शिजवून घेतले. पुरण शिजल्यावर त्यात डाव रुपवल्यावर जर तो डाव न पडता उभा राहिला तर पुरण चांगले शिजले आहे असे समजावे.
- 2
पुरणयंत्रातून पुरण एकदम बारीक वाटून घेतले.
- 3
मळलेल्या पीठाच्या गोळ्यामधे तेवढ्याच आकाराचा पुरणाचा गोळा घालून मोदका प्रमाणे बंद करून मग तांदळाचे पीठ पोलपाटावर घेऊन पुरणपोळी अलगद लाटावी. आणि तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावी.
- 4
तेलात मोहरी हिंग कढीपत्ता घालून फोडणी केली मग त्यात पुरणाचा कट घातला, आणि त्यात चिंचेचा कोळ, तिखट पूड, हळद, गोडा मसाला, मीठ आणि गुळ घालून चांगली उकळी येईपर्यंत कटाची आमटी उकळली.
- 5
मस्त गरमागरम पुरणपोळी, त्याबरोबर दुधाची वाटी, गरमागरम कटाची आमटी आणि वाफाळता भात या सगळ्याचा देवाला नैवेद्य अर्पण करून मग सगळ्यांनी आस्वाद घेतला.
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या (5)