कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य जमा करून घ्या.डाळ स्वच्छ 2_3 पाण्याने धुवून घ्या.कांदा चिरुन घ्या.
- 2
कोथिंबीर,मिरची,लसूण,आले, कोथॅबिर काड्या मिक्सरमधून बारीक करून घ्या.कढईत तेल घालून गरम करा.
- 3
आता जिरे मोहरी घालून तडतडले का कांदा घालून परतुन घ्या.वाटण घालून परतून घ्या.
- 4
हळद व हिंग घालून परतुन पाणी घालून उकळी आल्यावर त्यात डाळ घालून शिजवतात ठेवा.
- 5
आता तोपर्यंत भाकरी बनवू.तवा गरम करायला ठेवा ताटात पीठ घालुन मीठ घालून पाणी घालून गोळा भिजवुन घ्या.
- 6
भाकरी थापून घ्या.तव्यावर टाका पाणी लावुन घ्या भाकरी भाजुन घ्या.
- 7
गॅसवर ठेवुन भाजावेत म्हणजे मांडा येईल.
- 8
आता डाळ शिजली सर्व्हे करून घ्या.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16851447


























टिप्पण्या