चपाती चे चटपटीत सॅन्डविच

लहान मुलांसाठी चटपटीत व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे.
चपात्या शिल्लक राहिल्यास किंवा नवीन चपात्या बनवून तुम्ही रेसिपी करू शकता.
चपातीला तुम्ही टोमॅटो केचप, हिरवी चटणी लावू शकता. ही चटपटीत रेसिपी असल्यामुळे मी चिंचगुळाची आंबट गोड चटणी येथे वापरली आहे.

कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घेणे. बटाट्याचे साल काढून कुस्करून घेणे. कांदा,टोमॅटो,गाजर, सिमला मिरची,कोथिंबीर सर्व एकदम बारीक चिरून घेणे. चिरलेले सर्व साहित्य एका एकत्र करून घेणे. त्यात लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.
- 2
सर्व मसाले व चवीप्रमाणे मीठ घालून घेणे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणे व बाजूला ठेवणे.दोन चपात्या घेऊन त्यांना चिंचगुळाची आंबट गोड चटणी लावून घेणे.
- 3
जे आपण स्टफिंग तयार करून घेतलं, ते एका चपातीवर ठेवून, सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरवून दाबून घेणे. वरून बारीक शेव टाकून घेणे.
- 4
चिंचगुळाची चटणी लावलेली दुसरी चपाती त्यावर ठेवून घेणे. तव्याला तेल, तूप किंवा अमूल बटर लावून घेणे. चपाती अलगद उचलून तव्यावर ठेवणे.
- 5
एका बाजूने चांगली भाजून घेणे. वरच्या बाजूला पुन्हा बटर लावून घेणे. अलगद उलथणे व हाताचा वापर करून दुसरी बाजू उलटून घेणे. भाजलेले चपातीचे सँडविच ताटात काढून घेणे. पिझ्झा कटरने त्याचे चार भाग करून घेणे.
- 6
अजून बारीक हवे असल्यास अजून त्याचे तुकडे करून घेणे. सजावटीसाठी वरून थोडी चिंचेची चटणी टाकावी. शेव भुरभुरावी.
खाण्यासाठी तयार चटपटीत चपातीचे सँडविच.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या