काजु बोंडाचे सरबत

#काजुची बोंड वर्षातुन ऐकदाच मिळणारे फळ त्याचा आपल्या आहारात उपयोग करून घेतलाच पाहिजे तसेच यात भरपुर प्रमाणात व्हिटॉमिन C असते( संत्र्याच्या६ पटीने जास्त) प्रोटीनचे व फायबर चे प्रमाणही जास्त असते हे खुपच हेल्दी फ्रुट आहे

कुकिंग सूचना
- 1
काजु बोंड स्वच्छ धुवुन त्यातील काजुबिया वेगळ्या काढुन बोंडाचे तुकडे करून घ्या मिक्सर जारमध्ये साखर, मिरपुड, भाजलेली जिरेपुड मिक्स करा
- 2
साखरेची पावडर करून काढुन ठेवा
- 3
नंतर त्याच जारमध्ये काजुची कापलेली बोंड व पाणी मिक्स करून फिरवुन घ्या व नंतर चाळणीने गाळुन ठेवा
- 4
चोथा बाजुला काढा ह्या मिश्रणात तयार केलेली पिठिसाखर, चविनुसार मिठ मिक्स करून ढवळुन घ्या
- 5
शेवटी त्यात लिंबाचा रस मिक्स करून ढवळा आपले काजु बोंडाचे सरबत रेडी
- 6
ग्लासात बर्फाचे क्युब घेऊन त्यात तयार सरबत ओतुन सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या