कुकिंग सूचना
- 1
पनीर भुर्जी बनवण्याची प्राथमिक तयारी करून ठेवा म्हणजेच पनीर किसुन ठेवा, कांदे चिरून ठेवा, टोमॅटो किसुन ठेवा, मिरच्या बारीक चिरून आले किसुन ठेवा
- 2
कढईत तेल व बटर मिक्स करून गरम करा लगेच जिरे, मिरचीचे तुकडे व कडिपत्ता टाका परतुन घ्या नंतर त्यात चिरलेले कांदे मिक्स करून परता कांदा थोडा शिजल्यावर त्यात लसुणाचीपेस्ट व किसलेले आले मिक्स करून परता
- 3
नंतर त्यात हळद, काश्मिरी तिखट, तिखट, धनेजिरे पावडर मिक्स करून परता त्यातच टोमॅटो ची किसलेली पेस्ट व थोडे मिठ टाकुन झाकण ठेवुन शिजवा नंतर त्यात मटार मिक्स करून परता व शिजवा किचनकिंग मसाला व चाटमसाला मिक्स करून परता
- 4
नंतर त्यात किसलेले पनीर मिक्स करा व परता चविनुसार मिठ टाका व परत१-२ मिनिटे झाकण ठेवा व गॅस बंद करा
- 5
आपली पनीर भुर्जी रेडी वरून१-२ चिज क्युब किसुन टाका
- 6
गरमागरम पनीर भुर्जी प्लेटमध्ये काढुन वरून कोथिंबीर व चिज किसुन सोबत पोळ्या, पराठा, फुलके देऊन डिश सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes




















टिप्पण्या