कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम एक ताट घ्या, ताटात बेसन पीठ चाळून घ्या. थोडसं चिमूटभर मीठ टाका आणि दुधाने बेसनचा पीठ मळून घ्या. आपण पीठ मळायला पाणी सुद्धा वापरु शकतात. मळलेले पिठ थोडा वेळ बाजूला ठेवा. तोपर्यंत गॅसवर कढई ठेवा, कढईत गरजेनुसार तेल टाका तेल मिडीयम गरम झाल्यावर त्यात बेसन पिठाच्या जाडसर गोल गोल पुऱ्या बनवून गुलाबी रंगाचे होईपर्यंत मंद आचेवर तळा.
- 2
पुर्या तळून झाल्यावर त्या थंड होण्यासाठी ताटात ठेवा. थंड झाल्यावर हाताने थोडासा चुरा करून ते मिक्सर मधून जाडसर फिरवून घ्या. दुसरीकडे गॅस वर साखरेचा पाक तयार करण्यासाठी ठेवा. दीड वाटी साखरेत अर्धा कप पाणी टाका आणि पाक तयार करा. पाक तयार झाल्यावर, पाकात थोडा खाण्याचा केशरी रंग टाका.
- 3
पॅन मध्ये थोडेसे तूप टाका त्यामध्ये किसलेला खोबरा परतून घ्या. नंतर काजू बदाम, चे काप परतून घ्या. ताटात जाडसर दळलेले पीठ टाका त्यात किसलेला खोबरा टाका. थोडी इलायची पावडर टाका आणि नंतर साखरेचा पाक त्यात टाकून ते मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यावर ते गरम गरम एका ताटात थापून घ्या. थापून झाल्यावर त्याच्यावर काजू बदामाचे काप टाका. थंड झाल्यावर सुरीने त्याचे काप पाडा. त्यानंतर एका डिशमध्ये काढून त्याला काजू बदामने सजवा. आणि आता तयार आहे झटपट बेसन ची बर्फी.
- 4
ही बर्फी बनवायला खूप सोपी आहे आणि लहान मुलांना पण खायला खूप आवडते.
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या