पालकाची पातळ भाजी आणि बाजरीची भाकरी

#डिनर
पालकाची पातळ भाजी ही एक अत्यंत पौष्टिक डिश आहे.ही रेसिपी आमच्या घरी दर आठवड्याला होते.यात पालकासोबत जे बेसनाचे पीठ आपण घालतो त्यामुळे ह्या भाजीला एक वेगळेच टेक्सचर येते.यात घातलेले मसाल्याचे वाटण सुद्धा खूप साधे आहे.बाजरीच्या भाकरी सोबत ही भाजी उत्तम लागते. ही रेसिपी पूर्ण जेवणासाठी एक उत्तम डिश आहे.

कुकिंग सूचना
- 1
पालक चांगली धुऊन गरम पाण्यात उकळण्यास ठेवणे
- 2
पालक उकळल्यावर पाणी दुसऱ्या भांड्यात काढून ठेवणे.हे पाणी भाजी करण्यास वापरावे.
- 3
आता बेसन घेऊन ते निथळत ठेवलेल्या पालकात चांगल्या प्रकारे मिक्स करावे.
- 4
मिक्सर मध्ये हिरवी मिरची,लसूण पाकळ्या,जिरे आणि शेंगदान्याचा कूट घालून व थोडे पाणी घालून चांगली पेस्ट तयार करावी.
- 5
कढईत तेल टाकणे.
- 6
गरम तेलात मिक्सर मध्ये तयार केलेली पेस्ट टाकणे व चांगली तेल सुटे पर्यंत परतणे.
- 7
आता ह्यात बेसन व पालक यांचे मिश्रण टाकणे.चवीनुसार मीठ टाकणे.
- 8
दोघांना चांगले एकजिवं होई पर्यंत मिक्स करावे.
- 9
आता पालक उकळून बाजूला काढलेले पाणी यात टाकणे.
- 10
ही भाजी जास्त पातळ करू नये.हिला खाडे घटसर ठेवावे.
- 11
10 मिनिटे गॅसवर चांगली शिजून घेणे.
- 12
आपली पालकाची भाजी तयार आहे.गरमागरम बाजरीच्या भाकरी सोबत पालकाच्या भाजीचा मस्त आस्वाद घ्या.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या