मटकीची कचोरी

#कडधान्य , कचोरी हा प्रकार पहिल्यांदाच घरी बनवला हे सर्व cookpad च्या निमित्ताने शक्य झाले. घरातले सुद्धा सर्व खुश झाले.
मटकीची कचोरी
#कडधान्य , कचोरी हा प्रकार पहिल्यांदाच घरी बनवला हे सर्व cookpad च्या निमित्ताने शक्य झाले. घरातले सुद्धा सर्व खुश झाले.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घेतलं.
- 2
पॅनमध्ये ४ चमचे तेल घेऊन आधी मिरचीचे बारीक कप घेऊन त्यात टाकले चांगले मुरल्यावर आलं बारीक किसून टाकले मग भिजवलेले मटकी एकदा मिक्सर ला फिरवून घेतले आणि पॅन मध्ये टाकले मग अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग, दिड चमचा लाल मसाला, अर्धा चमचा गरम मसाला परतून घेतलं. गॅस काढला मग त्यावर सुक खोबर टाकलं.
- 3
पीठ घट्ट मळून घेतलं. मोहन टाकलं. अर्धा तास मळून ठेवलं.
- 4
गोळे करून पाती केल्या त्यात सारण टाकलं पुन्हा त्याचे गोल करून प्रेस केलं.
- 5
आधी कढई गरम करून घ्यायची मग मंद आचेवर कचोरी तेलात सोडायची तरी कचोरी सोनेरी रंगाची होण्यासाठी १५मिनिटे लागतात.
- 6
सगळ्या कचोरी बनवून झाल्यावर आपण त्याची चटणी बनवून घेऊ. दही घेऊन त्यात साखर घालून मिक्स करून घ्यावी त्यात बटाटा कुस्करून टाकावा. त्यात लाल तिखट, मीठ, काळ मीठ टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं. मग कचोरी मधून फोडून त्यात ही बटाट्याची चटणी टाकून वरती शेव घालून खायला घ्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या