स्पाइसी चिकन
पावसाळी वातावरण... आणि झणझणीत चिकन 🔥😋
कुकिंग निर्देश
- 1
चिकन स्वछ धुउन त्याला हळद,लाल तिखट,लिम्बू रस,धणे जीरे पाउडर,मीठ,सर्व लाऊन ठेवा.आले,मिर्च,कडीपत्ता,लसुण,कोथिम्बीर सर्व कढाई त 1 चमचा तेल टाकून एकेक करत भाजून घेऊन पेस्ट करा नंतर सर्व स्पाईसेस ड्राई फ्राई करा 1 वाटी कांदा ही 2 चमचे तेलात भाजून सर्व ची पेस्ट करा.
- 2
कढाई मधे तेल टाका 1 डाउल त्यात 1 वाटी कांदा लालसर भाजा नंतर त्यात 1 वाटी टोमॅटो प्यूरी घाला थोड़े मीठ घाला व बाजूने तेल सुटे पर्यन्त परता नंतर त्यात लाल मिर्च पाउडर थोड़ीच टाकून परता कारण मिर्च वाटणात पण आहे चिकन ला पण लावली आहे. आता चिकन परता व दोन्ही वाटण, मीठ,थोडे पानी टाकून एकजीव करा व झाकणा वर थोडे पानी ठेवा. Gas बारीक करून 15 मिनीट वाफेवर शिजू दया.
- 3
15 मिनिट नंतर त्यात ओले खोबरे घाला व अलगद मिक्स करून 2 मिनिट ठेऊन gas बंद करा. फुलके किंवा भाकरी बरोबर serve करा.
कीवर्ड
समान रेसिपी
और रेसिपीज़













कमैंट्स (16)