चिकन मॅगी नूडल्स (chicken maggi noodles recipe in marathi)

Trupti B. Raut @cook_23876333
चिकन मॅगी नूडल्स (chicken maggi noodles recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बोनलेस चिकन स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. आवडीनुसार भाज्या बारीक चिरून घ्या.
- 2
कडईत तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर आले लसुण पेस्ट घालून कांदा परतून घ्या. कांदा लालसर रंगावर परतुन झाल्यावर त्यात बारीक चिरलेल्या भाज्या आणि चिकन घालून व्यवस्थित परतून मध्यम आचेवर चिकन व भाज्या 15 मिनिटे शिजवून घ्या.
- 3
त्यानंतर त्यात मॅगी नुडल्स घालून व्यवस्थित परतून घ्या वरून मॅगी नुडल्स मसाला घालून चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून त्यात कोमट पाणी घालून 10 मिनिटे शिजवून घ्या.(मीठ घालताना लक्षात असू द्या मॅगी नुडल्स मसाला मध्ये मीठ प्रमाण असते)
- 4
10 मिनिटे शिजवून झाल्यावर वरून थोडी कोथिंबीर पेरून गरमागरम मॅगी नुडल्स सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13710745











टिप्पण्या