कच्च्या शेंगदाण्याची तिखट आंबट गोड चटणी

शेंगदाणे हे गरिबाच्या घरातले बदाम आहेत असे म्हणतात. शेंगदाणे हे रोज खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिजे, विटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.शेंगदाणे खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात.
लहान मुलांना रोज भाजी खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. म्हणून झटपट बनणारी अशी ही चटणी. जे साहित्य आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असते त्या साहित्यातच ही चटणी आपण बनवू शकतो.आपण हिला ब्रेड, पराठा, इडली, घावण, पोळी कशा सोबतही खाऊ शकतो.
ही माझी रेसिपी #GA4 #week4 साठी आहे.

कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे टरफले न काढलेली, मिरचीचे काप,कढीपत्ता, साखर,मीठ,लिंबूचा रस व चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात फिरवावे. आपल्या पसंतीनुसार घट्ट किंवा पातळ पाणी टाकून करू शकतात.
- 2
लिंबू मिरची साखर आणि कडीपत्ता या सर्वांची ची टेस्ट म्हणजे तिखट आंबट गोड गरम गरम पराठ्यासोबत नाहीतर ब्रेड सोबत आणि इडली सोबत सुद्धा आपण खाऊ शकतो. काही नसलं तर पोळी सुद्धा छान लागते या चटणीसोबत.. मुलं खूप आवडीने खातात. आवडीनुसार मिरचीचे प्रमाण किंवा साखरेचे प्रमाण कमीजास्त करू शकतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या