मुरमुरे लाडू (murmure ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर 100 ग्राम मुरमुरे एका कढईमध्ये मंद आचेवर 10 मिनिट भाजून घ्या.
- 2
त्याचानंतर एका कढईमध्ये 4 टेबलस्पून तूप गरम करून घ्या. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 200 ग्राम बारीक तुकडे केलेले गूळ टाकून मंद आचेवर वितळून घ्या.
- 3
गूळ वितळल्यानंतर वितळलेले गुळाच्या पाकाचा एक थेंब पाण्यात टाकून पाक झाले की नाही ते चेक करून घ्या. जर गुळाच्या पाकाचा एक थेंब पाण्यामध्ये टाकल्यानंतर विरघळत नसेल तर पाक तयार झाला आहे. जर विरघळत असेल तर अजून 5 मिनिट गुळाचा पाक शिजवून घ्या. आणि परत पाक चेक करून घ्या.
- 4
त्याचानंतर त्यामध्ये 100 ग्राम मुरमुरे टाकून चागलं मिक्स करून घ्या आणि 7 मिनिट मंद आचेवर परतून घ्या. मुरमुरे परतून झाल्यानंतर लगेच त्याचे एका आकाराचे लाडू बनवून घ्या. मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू बनवून घ्यावेत. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे लाडू बनवता येणार नाही.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या