थंडाई (thandai recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बडीशेप, खसखस,छोटी विलायची, मिरे तसेच जावित्री मंद आचेवर दोन मिनिटे भाजून घ्या.
- 2
आता काजू, बदाम, पिस्ता, चारोळी तसेच मगज बी सुद्धा मंद आचेवर भाजून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यातून प्रथम बडीशेप, खसखस, जावित्री,मिरे तसे छोटी विलायची घेऊन त्याची बारीक पावडर तयार करा.
- 3
आता सगळे ड्राय फ्रुट्स, मगज बीज तसेच खडीसाखर एकत्रितपणे वाटून त्याची सुद्धा बारीक पावडर तयार करून घ्या.आता दोन्ही पावडर एकत्रित करून परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.आपला थंडाई मसाला तयार आहे.
- 4
- 5
आता एका वाटीत तीन टीस्पून गरम गरम दूध घेऊन त्यात केशराच्या काड्या घालून घ्या.आता एका सर्व्हिंग ग्लासमध्ये थंड थंड दूध घेऊन त्यात दोन चमचे थंडाई मसाला तसेच केसरचा दूध घालून थंडाई सर्व करा. आवडत असल्यास आईस क्यूब आणि गुलकंद सुद्धा घालू शकता.
- 6
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14806027


















टिप्पण्या