रेस्टॉरंट स्टाईल तडकेवाली दाल खिचडी (tadkewala dal khichdi recipe in marathi)

#kr
#onepotmeal
आज आपण बघुया हॉटेल मध्ये मिळणारी दाल खिचडी सोबतच मसाला पापड चा आस्वाद घेऊयात...
रेस्टॉरंट स्टाईल तडकेवाली दाल खिचडी (tadkewala dal khichdi recipe in marathi)
#kr
#onepotmeal
आज आपण बघुया हॉटेल मध्ये मिळणारी दाल खिचडी सोबतच मसाला पापड चा आस्वाद घेऊयात...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ व डाळी 2-3 वेळा स्वच्छ धुऊन 10-15 भिजवून घ्या.
- 2
आता एका पातेल्यात पाणी गरम करून घ्या व भिजवलेले तांदूळ आणि थोडे मीठ घालून 90% शिजवून घ्या. व उरलेले पाणी चाळणी वर निथळून घेऊन भात ताटात पासरुन ठेवा म्हणजे चिकट होणार नाही.
- 3
आता कुकर मध्ये तूप घालून गरम करून घ्या व त्यात जीरे घाला, जीरे तडतडले की हिंग, आल्याचे काप घालून थोडे परतून घेऊन भिजवलेल्या डाळी, हळद, मीठ व आवश्यकतेनुसार पाणी, घालून 3-4 शिट्ट्या द्या.
- 4
आता एका मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे घालून तडतडले की मिरची- लसणाचे वाटण घालून २ मिनिटे परतावे, मग २ मि. लाल मिरची परतावी व कांदा मऊसर शिजवून घ्या व टोमॅटो २-३ मिनिटे परतून घ्या.
- 5
आता सगळे मसाले घालून मिक्स करुन ३-४ मिनिटे परतावे. (हळद, लाल तिखट, धने पावडर, आमचुर पावडर, गरम मसाला, कसूरी मेथी)
- 6
आता शिजलेली डाळ घालून मिक्स करा,व भात घालून छान मिक्स करावे,व आवश्यकतेनुसार पाणी व मीठ घालून ५-७ मिनिटे झाकण ठेऊन १-२ वाफा काढाव्या.
- 7
आपली तडकेवाली दाल खिचडी झाली पण... मसाला पापड सोबत सर्व्ह केली तरी चालेल.....
- 8
सर्व्ह करताना तडका द्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या (5)