शेंगोळ्याची आमटी (shengodyachi amti recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण सांगो जिन्नस मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
- 2
आता एका तसराळ्यात ज्वारी पीठ, बेसन, गहू पीठ, ओवा, मीठ, तेल, हळद आणि थोडे लागेल तसे पाणी घालून सगळे जिन्नस एकत्र करून घट्ट कणिक मळून घ्या. आणि 15-20 मिनोटे झाकून ठेवा.
- 3
आता कढई मध्ये तेल गरम करून त्यात कानडे छान सोनेरी रंगावर परतून घ्यावा, खोबरं सुद्धा छान भाजून घ्या. आणि थंड करून मिक्सर ला बारीक वाटून घ्या. सोबत टोमॅटो सुद्धा वाटा.
- 4
आता कढई मध्ये तेल गरम करून मोहोरी, जीरे, हिंग घालून फोडणी करून लगेच हळद, आणि तिखट घालावे.
- 5
आता उरलेले वाटण फोडणी मध्ये घालून तेल सुटपर्यंत परतावे.
- 6
आता त्यात गरम पाणी, मीठ, गरम मसाला,घालून छानपैकी एक उकळी आणावी.
- 7
आता पिठाचा एक छोटासा गोळा करून हातावर वळून घेऊन मध्ये फोल्ड करू दोन्ही कडा बंद करा, अशा प्रकारे सगळे शेंगोळे करून घ्या, आणि एक एक करून शेंगोळे आमटी मध्ये सोडा आणि छान शिजवून घ्या. मध्ये मध्ये चेक करत राहा.
- 8
- 9
आपली शेंगोळ्याची आमटी तयार आहे. कर कोथिंबीर घालून पोळी किंवा भाता सोबत वाढू शकता.
- 10
Keywords
Similar Recipes
More Recipes
























टिप्पण्या (2)