कळण्याची पुरी (kalnyachi puri recipe in marathi)

#KS4
खानदेशी खाद्य संस्कृती मधील खास अशी ही रेसिपी 'कळण्याची पुरी'. हिरव्या वांग्याच्या भरीतासोबत ही पुरी सर्व्ह करतात. मला ही रेसिपी आवडली कारण ती ग्लुटेन फ्री आहे.....

कुकिंग सूचना
- 1
कळण्याचे पीठ म्हणजे ज्वारी, उडदाची डाळ, धने व मेथी दाणे एकत्र करून दळून आणलेले पीठ. इथे मी १ वाटी ज्वारीच्या पिठात अर्धी वाटी उडदाची डाळ, धने व मेथी दाणे एकत्र करून मिक्सर वर बारीक करून टाकली आहे. आता हे पीठ चवीनुसार मीठ, थोडी हळद, थोडे तिखट घालून लागेल तसे पाणी घालून मळून घ्यावे. थोड्याश्या तेलाचा हात लावून १५-२० मिनीटे झाकून ठेवावे.
- 2
१५-२० मिनीटांनंतर या पिठाच्या पुर्या लाटून तळून घ्याव्या.
- 3
या पुर्या हिरव्या वांग्याच्या भरीतासोबत सर्व्ह करा. आज मी खानदेशी मेन्यू केला होता. हि पूरी मी भरीतासोबत सर्व्ह केली आहे....
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)