नवरत्न व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)

#shr ।ही रेसिपी मुळात अकबरच्या काळात जन्माला आलेली। असे म्हणतात त्याच्या सभेतील 9 रत्नांन्ना उद्देशून हे बनवलेले। या मध्ये आपण कोणतेही 9 पदार्थ वापरू शकता।

कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला बासमती तांदूळ 3-4 वेळा धुवून घ्यावे आणि पाण्यात भिजवून ठेवावे।
- 2
ड्राय फ्रुईट्स काही वेळ पाण्यात भिजवून ठेवावे आणि पुढे कापून तुपात रोस्ट करून घ्यावे।
- 3
आता अजून थोडे तूप घालून त्यात तेज पान, कांदा, बटाटे आणि गाजर घालून मिक्स करावे। थोडे मीठ घालून मिक्स करावे।
- 4
पुढे त्यात हिरवे वाटणे, फ्रेंच बीन्स घालावे आणि अद्रक ग्रेट करून घालावे।
- 5
आता पुढे 5 मिनिटे शिजू द्यावे आणि त्यात भिजवलेला तांदूळ घालावा। त्यात मिरे पूड घालून मिक्स करावे। एका भांड्यात गरम पाणी ठेवावे, आणि 1/2 वाटी गरम दुधात केसर घालून ठेवावे।
- 6
आता तांदळात गरम पाणी घालावे आणि मिक्स करावे, त्यात थोडी साखर घालून मिक्स करून घ्यावे। आणि कुकरला एक शिट्टी येऊ द्यावी आणि बंद करावे।
- 7
आता त्यावर केसर दूध आणि ड्राय फ्रुईट्स घालून मिक्स करून घ्यावे आज 1/2 चमचा तूप घालावे। सोबत थोडा रायता (बारीक काकडी, कांदा, दही, जीरे पूड, मिरे पूड, मीठ) बनवून घ्यावा! आपला नवरत्न पुलाव तयार ।
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)