अळू वडी (alu vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अळूच्या पानाची देठं कापून घेणे व अळूची पाने स्वच्छ धुऊन घेणे नंतर एक वाटी घेणे. वाटी मध्ये सगळी पीठ घेणे. त्यात सगळे मसाले, चिंचेचा कोळ व गूळ पावडर घालून मिक्स करून घेणे विकी जास्त पातळ करू नये जाडसरच ठेवावे
- 2
नंतर एकेक पान उलटे ठेवून त्याला पीठ लावून घेणे व एकावर एक पाच पाने लावून घेणे
- 3
आत्ता त्याचा रोल करून घेणे असे सगळ्या पानांचे पंधरा पानांचे तीन उंडे तयार करून घेतले
- 4
नंतर एका कढईत पाणी ठेवून त्यावर चाळण ठेवून पंधरा मिनिटं अळूवड्या वाफवून घेणे नंतर अळूचे उंडे थंड झाल्यानंतर गोल कापून घेणे
- 5
नंतर एका कढईत तेल तापत ठेवणे व मध्यम आचेवर एक पाच मिनिट तळून घेणे गरमागरम अळूवडी तयार
- 6
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15438832



















टिप्पण्या (5)