लेमन राईस (lemon rice recipe in marathi)

#ccs गणपतीला गावी गेलो तेव्हा काका - काकींनी लावलेल्या लिंबाच्या झाडाला भरपूर लिंब लगडलेली दिसली. आणली त्यातली ४ तोडून. योगायोग म्हणजे "Cookpad ची शाळा हे चॅलेंज" मध्ये नेमका "लेमन राईस" च समोर दिसला. एका मोठ्या लिंबाचं सार्थक झालं :D
लिंबाचे २ प्रकार असतात - Lime & Lemon. Lime छोटे असतात आणि lemon आकाराने मोठे. Lime पेक्षा Lemon मध्ये व्हिटॅमिन सी जास्त असतं त्यामुळे कधीही Lemon जेवणात वापरलेले कधीहि चांगले.

कुकिंग सूचना
- 1
३ वाट्या तांदूळ धुवून शिजवून घेतला. शिजवताना २ चमचे तूप घालायचं म्हणजे भात मोकळा होतो. शिजलेला भात एका ताटात मोकळा करून ठेवला.
- 2
१ मोठा कांदा आणि २ हिरव्या तिखट ओल्या मिरच्या चिरून ठेवले. १ मोठं लिंबू (Lemon) चा रस पिळून घेतला. कुकर मध्ये ३-४ चमचे खाद्यतेल गरम करून काजू तळून घेतले. तळलेले काजू बाजूला काढून त्याच तेलात शेंगदाणे सुद्धा तळून घेतले. तळलेले शेंगदाणे बाजूला काढले.
- 3
त्याच तेलात कढीपत्त्याची पाने - मोहरी - जिरं - हिंग ची फोडणी दिली. २ चमचे उडीद डाळ आणि ४ चमचे पंढरपुरी चणा डाळ तेलावर परतली. पाव चमचा हळद तेलावर फुटू दिली. चिरलेल्या मिरच्या आणि कांदा तेलावर परतून घेतला. चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून शिजू दिलं.
- 4
शिजवलेला भात ऍड केला. सर्व एकत्र मिक्स करून घेतलं. गॅस बंद करून लिंबाचा रस पिळून घेतला. तळलेले शेंगदाणे आणि काजू घातले. पुन्हा एकदा मिक्स करून भात झाकून ठेवून दिला.
तिखट आंबट चवीचा लेमन राईस तयार :)
~ सुप्रिया घुडे
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)